Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शारदीय नवरात्री निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मातृशक्तींचा हिंदी मराठी पत्रकार संघ मलकापूरतर्फे यथोचित सन्मान

 



धर्मेशसिंह राजपूत प्रतिनिधी

   आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरे करण्यात येतात. त्यापैकीच नवरात्री हा देवीचा उत्सव  संपूर्ण भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. ह्याला शारदीय नवरात्र असेही म्हणतात. देवी मातेने नऊ दिवस दैत्यांशी युद्ध करून महिषासुर नामक राक्षसाचा नाश केला होता म्हणून देवी मातेला महिषासुर मर्दिनी देखील म्हणतात. अशा या शक्तीचा म्हणजेच मातृशक्तीचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने भक्तांकडून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीच्या इतिहासाला मातृशक्तीचे मोठे योगदान लाभलेले आहे. इतिहासाची पाने उलटली तर महाराणी पद्मावती, राजमाता जिजाऊ मासाहेब,माता रमाबाई आंबेडकर,झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, श्रीमती इंदिरा गांधी व नुकतीच भारताच्या सर्वोच्च स्थानी म्हणजे राष्ट्रपतीपदी निवड झाली असणाऱ्या श्रीमती द्रौपदी मूर्मू हे या मातृशक्तीचे प्रतीक आहे. वेळोवेळी या मातृ शक्तीने आपल्या देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी अविस्मरणीय असे कार्य केले आहे. 

या अनुषंघाने नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या,सर्वसामान्य,तळागाळातील जनतेच्या न्याय हक्कासाठी व हितासाठी तसेच समाजोपयोगी सेवेसाठी कटिबद्ध असणाऱ्या हिंदी मराठी पत्रकार संघ मलकापूर यांचे वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे यांच्या मातृशक्ती असणाऱ्या जिजाऊ माॅं साहेब यांचे माहेर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा. अशी पावनभूमी असणाऱ्या, मातृशक्तींचा वारसा लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील माताभगीनींचा- मातृशक्तींचा नवरात्री निमित्त मानसन्मान व आदर व्हावा व त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त व्हावी या उद्देशाने मलकापूर शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मातृशक्तींचा म्हणजेच महिला भगिनींचा सत्कार व सन्मान करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गृहिणी असणाऱ्या मातांचा ज्यांनी कोरोना सारख्या महामारीच्या वेळी सर्वसामान्य असणाऱ्या आपल्या परिवाराचा संसाररुपी गाडा मोठ्या हिंमतीने व धैर्याने ओढत आपल्या परिवाराला यातून अबाधित राखत आज सुखरूप इथपर्यंत आणले म्हणून त्यांच्या धैर्याचा,हिंमतीचा कुठेतरी सन्मान व्हावा म्हणून हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे आज पत्रकार संघाचे कार्यालयावर संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर पाटील यांच्या उपस्थितीत छोटे खाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सौ. सरिताताई बगाडे, सौ. गीताताई देवकर सौ. कुसुमताई वानखेडे, सौ. रेखाताई उगले, सौ. राधाताई वानखेडे या मातृ शक्तींचा पुष्पगुच्छ व गृहोपयोगी भेटवस्तू देत आदरपूर्वक सन्मान व गौरव करण्यात आला. 


तसेच नवरात्रीचे नऊ दिवस विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माता भगिनींचा सत्कार व सन्मान करण्याचे हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे निर्णय घेण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात हिं.म.पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर यांनी एक महिला म्हणून महिलांना आपले जीवन जगतांना,गृहिणी असणाऱ्या माता भगिनींना आपल्या परिवारातील सर्व सदस्यांच्या अडीअडचणी,मानसन्मान सांभाळत किती कसरत करावी लागते याची उपस्थित पत्रकार बांधवांना संबोधित करून माता भगिनींचा सन्मान करण्यात यावा ही काळाची गरज असल्याचे सांगितले.तसेच सौ.सारिकाताई बगाडे यांनी आपल्या सन्मानाला उत्तर देत पत्रकार बांधवांनी आपल्यासारख्या महिलांचा केलेला सन्मान हा वाखाणण्याजोगा असून पत्रकार बांधवांनी केलेल्या सन्मानामुळे आमच्या सारख्या माता भगिनींना हिंमत मिळून   उत्साह वाढतो व आनंद मिळत असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर,  विदर्भ प्रसिध्दी प्रमुख अजय टप,विदर्भ सचिव सतिष दांडगे,

तालुका अध्यक्ष उल्हास भाई शेगोकार,जिल्हाध्यक्ष गौरव खरे, जिल्हा सचिव स्वप्निल आकोटकर, महासचिव करण सिंग, तालुका सचिव श्रीकृष्ण भगत,सहसचिव विनायक तळेकर तालुका संपर्क प्रमुख धर्मेशसिंह राजपूत,विदर्भ ब्यूरो चिफ अपरेश तुपकरी, सह संपर्क प्रमुख प्रदीप इंगळे,शहर संघटक योगेश सोनवणे, मलकापूर प्लसचे प्रतिनिधी संजय वानखेडे, राहूल संबारे, प्रा.प्रकाश थाटे,प्रमोद हिवराळे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments