Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कन्नड भिलदरी येथे बिबट्याचा धुमाकूळ

 भिलदरी(पि.)(ता.कन्नड) येथील भिलदरी येथे दि 12 रोजी बिबट्याच्या हल्ल्यात 06शेळ्या ठार झाल्या आहेत. भिलदरी येथील शेतकरी सुभाष दौलत सुलाने यांच्या शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली.

याबाबत वनविभागाकडून सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. शासकीय नियमानुसार संबंधित शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

भिलदरी भागात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात शेतात काम करणाऱ्या महिला तसेच शेतवस्तीवरुन शाळेत येणाऱ्या मुलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यापुर्वीही चुन्नीलाल कायटे, अर्जुन सिंगल, गोकुळ वैष्णव, हुसैन शहा यांच्या प्रत्येकी १ अशा शेळ्यावर व केसरसिंग सिंगल यांच्या म्हशीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे.चंदन गोटवाळ व आर्जुन कायटे नारायण राजपुत यांची व गावकऱ्या चे मक्याचे रानडुकराने खूप नुकसान केले गेल्या दोन महिन्यातील ही सहावी घटना असून यामुळे येथील शेतकरी व ग्रामस्थांच्यात मोठी घबराट पसरली आहे. तसेच या परिसरात रानडुकरांमुळे शेतमालाचे खूप नुकसान होत आहे.तरीही वन विभागाकडून कोणतीही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत. वन विभागाच्या या कारभारामुळे ग्रामस्थांच्यात वन विभागाबाबत तीव्र नाराजीचा सूर उमठू लागला आहे. वनविभागाने याबाबत गांभीर्याने घ्यावे नाहीतर वनविभाग कार्यालयावर उपोषण करण्यात येईल, असा इशारा नागरिकानी दिला आहे..


Post a Comment

0 Comments