Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

 *मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहा


त साजरा*


*जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा आदरणीय भीलदरीचे उपसरपंच विजयजी वैष्णव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.*


ढोल पथकाच्या गजरात शालेय परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी ,गीत,भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली



*मुख्याध्यापक बीसी निकम व निवृत्त शिक्षक एम आर भाळकर यांनी मार्गदर्शन केले*:-ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती ही संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली. मात्र हैदराबाद,काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती.स्वतंत्र्यानंतर इंग्रजांची राजवट गेली पण या तीन संस्थानातील लोक मात्र अद्याप स्वतंत्र झाले नव्हते.त्या काळात मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानाचा भाग होता आणि मराठवाड्याच्याा जनतेला स्वतंत्र मिळवण्यासाठी हैद्राबादच्या निजामाविरोधात दिर्घ लढा द्यावा लागला,तसेच अनेकांना या लढ्यात त्यांच्या जीवाचे बलिदान द्यावे लागले.17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला.



*यावेळी फौजी चेतन कुरंकार फौजी अक्षय कुरकार फौजी जनार्दनगायकवाड माजी सरपंच के एम गायकवाड नंदू शेठ राजपूत सलीम काका चेअरमन फकीराव काळे ,संतोष राजपूत शाळेय समितीचे अध्यक्ष फारुक शहा विनोद सोनवणे ग्रामपंचायत सदस्य सागर पंडित कडूबा बिराडे शाळेचे पर्यवेक्षक सी एल दाबके वरिष्ठ लिपिक अजिनाथ जाधव ज्येष्ठ शिक्षक एम एम तायडे एस एन पाटील एस व्ही कांबळे सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते* कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय बी निकम यांनी केले व आभार प्रदर्शन विलास लोखंडे यांनी केले

Post a Comment

0 Comments