गंगापूर(प्रतिनिधी) नोकरी महोत्सवाचे गाजर दाखवून युवकांना मृगजळ दाखविण्यापेक्षा खरोखरच काळजी असेल तर सतीश चव्हाण यांनी गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील सुशिक्षित मुलांना मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील रिक्त जागांवर बिनशर्त तसेच कुठलाही घोडेबाजार होणार नाही याची दक्षता घेऊन नोकरी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा संघटक वाल्मिक शिरसाठ यांनी केली आहे.
पदवीधर मतदार संघाची सतरा वर्ष आमदारकी भोगल्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची सुप्त इच्छा जागी झाल्यामुळे चव्हाण यांनी मतदार संघातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी गंगापूर येथे नोकरी महोत्सव आयोजित केला आहे.नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून केवळ गर्दी जमऊन शक्ती प्रदर्शन करण्याचा सतीश चव्हाण यांचा हा डाव आहे.इतकी वर्ष पदवीधरांच्या नावावर सत्ता भोगणाऱ्या सतीश चव्हाण यांनी यापूर्वी गंगापूर खुलताबाद तालुक्यात यापूर्वी किती नोकरी महोत्सव घेतले,किती युवकांना नोकरीची संधी दिली,किती तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला, किती मुलांची शैक्षणिक फीस माफ करून मोफत शिक्षण दिले.सतरा वर्ष गंगापूर खुलताबाद तालुका सतीश चव्हाण यांच्या पदवीधर मतदारसंघात नव्हता काय याचा देखील त्यांनी खुलासा करावा.
गंगापूर खुलताबाद तालुक्यातील बेरोजगार तरुणांची खरोखरच काळजी असेल तर राज्यातील सत्तेत सतीश चव्हाण यांचा पक्ष सहभागी आहे तसेच त्यांचे नेते राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून सतीश चव्हाण यांनी शासनाची रीतसर परवानगी घेऊन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व रिक्त जागांवर गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील पदवीधर,बेरोजगार युवकांना विनाअठ संधी द्यावी.दरवर्षी शासनाचे कोट्यावधी रुपयाचे अनुदान मंडळाच्या माध्यमातून मिळत असताना देखील देवगिरी महाविद्यालयात खाजगी क्लासेसच्या नावाखाली सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांकडून सुरू असलेली लूट अगोदर थांबवावी अशी मागणी ही वाल्मिक शिरसाठ यांनी यावेळी केली.
Post a Comment
0 Comments