भाजपाच्या विचारमंथन बैठकीनंतर वैजापुरातील शेकडो कार्यकत्यांचा पक्षाला रामराम!!!
भाजपचे सर्वेसर्वा तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले आहे. त्यांचा दौरा पूर्ण होण्याअगोदरच भाजपाचे वैजापूर तालुक्यातील पदाधिकारी डॉ. दिनेश परदेशी हे आज बुधवारी मुंबई येथे *तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री* येथे शिवबंधनात बांधणार आहेत. त्यांच्या समवेत शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहे. एकीकडे भाजपचा मराठवाडा जिंकण्यासाठी पदाधिकारी मेळावा घेतला जात असताना भाजपाच्या ध्येयधोरणाला कंटाळून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहे.
*प्रवेश थांबविण्यासाठी दिली होती ईडीसीबीआयची धमकी*
15 सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . त्यांच्या प्रवेशाला अडकाव करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी भाजपाच्या एका बड्या नेत्याला सांगून ईडीसीबीआयची धमकी देत प्रवेश रोखला होता. मात्र, त्यांच्या या धमगक्यांना भीक न घालता आज डॉ. परदेशी हे शिवसेनेच्या वाटेवर आले आहे. त्यामुळे हा प्रवेश रोखण्याचा केविलवाणी प्रयत्न करणाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत धुळ चाखल्याशिवाय डॉक्टर दिनेश परदेशी व त्यांचे कार्यकर्ते स्वस्त बसणार नाही हे मात्र खरे.
*तालुक्यातील काड्यासंम्राटाचा डॉक्टर इलाज करणार!!!*
डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या पक्षप्रवेशाला वैजापूर तालुक्यातील काही काड्यासम्राटाने मिद्दे गटाच्या प्रमुखाला सांगून भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या माध्यमातून दबाव आणत प्रवेश रोखला होता. कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी केलेल्या भाषणात घाबरेल तो राजपूत कसला? असा सल्ला डॉक्टर परदेशी यांना दिला होता त्यामुळे या काड्यासम्राटांना भीक न घालता अखेर डॉक्टर परदेशी हे शिवसेनेत दाखल होत आहे. त्यामुळे आता या स्वयंघोषित काड्यासम्राटाचा इलाज डॉक्टर केल्याशिवाय राहणार नाही असे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.
Post a Comment
0 Comments